इंदापूर पोलिसांनी पकडला अवैध गुटखा,तीन लाख 90 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत एकास अटक

May 8, 2025 - 07:12
 0  1084
इंदापूर पोलिसांनी पकडला अवैध गुटखा,तीन लाख 90 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत एकास अटक

इंदापूर पोलिसांनी विक्रीसाठी बंदी असलेल्या गुटख्यावरती कारवाई केली आहे.या कारवाई पोलिसांनी एकूण तीन लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत एकाला अटक केली आहे. इम्रान हुसेन शेख असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदापूर पोलिसांना नगरपरिषद कार्यालयाच्या पाठीमागील शेख इंटरप्राईजेस समोर एका चार चाकी वाहनात इमरान शेख हा अवैध गुटखा विक्री करताना आढळून आला त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,दिनांक पाच मे रोजी सकाळी साडेआठ वाजता चे सुमारास इंदापूर नगरपरिषद कार्यालयाच्या पाठीमागे शेख इंटरप्राईजेस समोर इमरान शेख हा एका चारचाकी वाहनातून विक्रीस बंदी असलेला गुटखा विक्री करताना आढळून आला त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण विक्रीत बंदी असलेल्या एक लाख 90 हजार 360 रुपये किमतीचा गुटखा आणि दोन लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन असा एकूण तीन लाख 90 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याप्रकरणी आता इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता सन 2023 चे कलम 123,223,275, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (1), 26(2) (6),27(3) (ड).27(3)(इ),59(3) नुसार पोलीस कॉन्स्टेबल गणेश मच्छिंद्र ढेरे यांच्या तक्रारीवरून इम्रान हुसेन शेख वय 37 वशे रा. इंदापूर 40 फुटीरोड ता. इंदापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या गुन्ह्याचा पुढील तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow