दौंड पुन्हा हादरलं ! अवैद्य गर्भपात प्रकरणी 'या' दोन डॉक्टरांवर यवत पोलिसात गुन्हा

Jun 7, 2026 - 17:18
Jun 7, 2026 - 17:20
 0  299
दौंड पुन्हा हादरलं ! अवैद्य गर्भपात प्रकरणी 'या' दोन डॉक्टरांवर यवत पोलिसात गुन्हा

आय मिरर 

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात केडगाव येथील लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात झाल्याच प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात डॉ. स्वाती लवंगारे आणि रुग्णालयात व्हिजिट देणारे डॉ. तुकाराम यशवंत मोटे या दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार डॉ. स्वाती लवंगारे या स्त्रीरोगतज्ञ नसतानाही गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा करून त्याचा वापर करून अवैधरीत्या गर्भपात केल्याचा आरोप आहे. तर डॉ. तुकाराम मोटे यांनी गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्याची नोंद वैद्यकीय कागदपत्रांमध्ये आढळली आहे. 

ही घटना 6 जून 2026 रोजी दुपारी केडगाव येथील रुग्णालयात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आज 7 जूनला दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन गुजर यांनी यवत पोलिसात तक्रार दाखल केली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

याबाबत अधिक ची माहिती अशी की,काल शनिवारी सहा जून रोजी जिल्हा शल्यशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक आणि डॉक्टर सचिन गुजर यांनी मिळून लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत गर्भपातांच्या संदर्भामध्ये काही अनियमितता आढळून आली. काही गर्भपाताच्या गोळ्याही या हॉस्पिटलमध्ये आढळून आल्या.

पथकाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रजिस्टरची तपासणी केली असता बऱ्याच लोकांचा गर्भपात करण्यात आला आहे हे दिसून आलं. डॉक्टर तुकाराम मोटे आणि डॉक्टर स्वाती लवंगारे यांच्याकडे रजिस्टरचा टाळमेळ बसला नाही. त्यामुळे डॉक्टर सचिन गुजर यांनी या दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा पुढील तपास आता यवत पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow