बिग ब्रेकिंग | बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक ! एका अंगणवाडी मदतनीस वर गुन्हा दाखल - इंदापूर पंचायत समितीतील प्रकार

Jan 30, 2024 - 06:59
 0  1738
बिग ब्रेकिंग | बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक ! एका अंगणवाडी मदतनीस वर गुन्हा दाखल - इंदापूर पंचायत समितीतील प्रकार

आय मिरर(देवा राखुंडे) 

अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका होण्यासाठी दहावीचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला देऊन फसवणूक केल्याबद्दल एका अंगणवाडी मदतनीस महिलेवर गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे.

 सीमा मल्हारी बोरकर उर्फ सीमा बाळासाहेब खामगळ (मूळ राहणार वडापुरी, तालुका, इंदापूर ,जिल्हा पुणे) सध्या राहणार वृंदावन अपारमेंट इंदापूर असे गुन्हा दाखल झालेल्या अंगणवाडी मदतनीसचे नाव आहे.

याबाबत इंदापूर पंचायत समितीतील एकात्मिक बालविकास योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप आनंदराव काळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सीमा बोरकर उर्फ सीमा खामगळ या 19 एप्रिल 1999 पासून रामवाडी वडापुरी येथे अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी मदतनीस पदावर काम करीत होत्या, त्यानंतर 27 जानेवारी 2023 रोजी त्यांना मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका म्हणून वडापुरी येथे पदोन्नती मिळाली.

यानंतर मला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर अंगणवाडी सेविका यांनी इयत्ता दहावीचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला हा खोटा दिला आहे. तुम्ही खात्री करा यावरून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.बी. गिरासे यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी तुम्ही कागदपत्राची पडताळणी करा असे सांगितल्यानंतर मोरजाई विद्यालय मोरोची तालुका- माळशिरस,जिल्हा सोलापूर येथील मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी आम्ही या नावाने दाखला वितरित केलेला नाही असे कळविले. 

त्यानंतर 20 नोव्हेंबर 2023 ला राज्याचे माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळच्या विभागीय सचिवांनी सदर महिलेने सादर केलेली दहावीचे मार्च 1995 चे बैठक क्रमांक हा मुलगा नामे धाबू अमित विश्वनाथ याचे नावे रजिस्टर असून या महिलेची कोणत्याही दप्तरी नोंद मिळून येत नाही असा लेखी अहवाल पाठविल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार इंदापूर पोलीस स्टेशनला सीमा बोरकर उर्फ सीमा खामगळ यांच्याविरुद्ध गुणपत्रक व कागदपत्रे फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट तयार करून ती खरी आहेत म्हणून वापरून शासनाची फसवणूक केली असा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow