पायातील चप्पल वरून वाद, पुजाऱ्याला बेदम मारहाण ! सोन्याच्या जेजुरीत हे काय घडलं ?

Jun 8, 2026 - 09:30
Jun 8, 2026 - 10:03
 0  171
पायातील चप्पल वरून वाद, पुजाऱ्याला बेदम मारहाण ! सोन्याच्या जेजुरीत हे काय घडलं ?

आय मिरर 

जेजुरी गडावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गडावरील पालखी परिसरात काही व्यक्ती चप्पल घालून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथील एका पुजाऱ्याने संबंधितांना "पालखी शेजारी चप्पल घालून का आलात?" असा सवाल केला.

यावेळी झालेल्या वादानंतर तीन ते चार जणांनी संबंधित पुजाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे गड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

धार्मिक स्थळांवर परंपरा, नियम आणि श्रद्धेचे पालन करणे ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी सूचना करणाऱ्या पुजाऱ्यावरच हल्ला झाल्याच्या आरोपामुळे अनेक भाविक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.अशा पवित्र ठिकाणी वाद घालणे किंवा कायदा हातात घेणे योग्य नसल्याची भावना देखील व्यक्त होत आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या संबंधित पुजारी यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार पुजाऱ्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून संबंधित घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस तपासानंतर संपूर्ण सत्य परिस्थिती समोर येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow