Dound खेळता खेळता तिघांनी कालव्यात उड्या मारल्या एका चिमुकल्याचा मृत्यू ,दोघे बचावले

आय मिरर
दौंड तालुक्यातील सहजपूर येथे एका तीन वर्षाच्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे. माकरवस्ती परिसरात तीन लहान मुलं खेळता खेळता थेट कालव्यात उडी मारली. त्यातील एका तीन वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.आसिम जावेद मुजावर असं त्याच नाव आहे.तर महेक आणि रूहान यांना वाचवण्यात यश आलं.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुजावर कुटुंबीय सहजपुर येथील माकरवस्ती परिसरात कालव्याच्या बाजूलाच वास्तव्यास आहेत. आज सकाळी ही तिघेही भावंडं कालव्यालगत खेळण्यासाठी गेली होती.खेळत असताना तिघांनीही कालव्यात उडी मारली.
हा प्रकार शेजारीच राहत असलेल्या एका महिलेने पाहिल. तिनं मुलांनी पाण्यात उड्या मारल्या असं म्हणत आरडाओरड केल्यानंतर नीलेश खोमणे यांनी तात्काळ पळत जाऊन कालव्यातून दोघा चिमूरड्यांना बाहेर काढलं. तोपर्यंत आसिम हा पाण्यात बुडाला होता.
स्थानिक नागरिकांनी शोधाशोध केल्यानंतर तो एका बाजूला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.आसिमला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. या घटनेनंतर सहजपुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी यवत पोलिस अधिक तपास करत आहेत.
What's Your Reaction?






