त्याला गांजा विक्री करायचा होता,पण त्यापूर्वीच पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

आय मिरर
इंदापूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एकाला रंगेहात पकडले असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल चार किलो गांजा आणि एक दुचाकी असा एकूण 2 लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी पिक्या भानुदास काळे यांच्या विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या हद्दीत एका हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. 15 एप्रिल रोजी इंदापुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सहा पो फौजदार प्रकाश माने यांना खबऱ्या कडून बातमी मिळाली की, पुणे सोलापुर हायवे रोडवर लोणीदेवकर येथे हॉटेल मथुराज जवळ एक व्यक्ती त्याचे बुलेट मोटारसायकल वरून गांजा विकीसाठी येणार आहे. मिळालेल्या बातमीवरुन पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना याबाबत कल्पना देऊन त्यांच्याकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहीते, सहा पो फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण यांचे बदकाची कारवाईसाठी नेमणूक केली
पोलीस पथकाने सापळा लावुन पिक्या भानुदास काळे वय २८ वर्ष रा काटी ता इंदापुर जि पुणे यास ४ किलो १६० ग्रॅम गांजा, बुलेट मोटारसायकल आणि मोबाईल हँडसेट सह एकुण २,५०,०००/- रुपयेच्या मुदद्देमालासह ताब्यात घेतले आहे. इंदापुर पोलीस स्टेशन माझे त्याच्या विरोधात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यास ३ दिवस पोलीस कस्टडी दिली असुन गुन्हयाचा पुढील आधिक तपास साहेब पोलीस निरीक्षक जिवन मोहीते करीत आहेत.
गांजाची तस्करी करणाऱ्यांवर इंदापुर गुन्हे शोध पथकाची करडी नजर असुन यापुढेही अशा प्रकारच्या अनेक कारवाया करण्याची तजवीज ठेवली आहे. यापुर्वी देखील इंदापुर पोलीसांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर अनेक कारवाया केलेल्या आहेत. तसेच पोलीस स्टेशन हददीतील यापुर्वी अशा प्रकारे अमलीपदार्थ, (गांजा) विक्री करण्याच्या केसमध्ये बाहेर जिल्ह्यात व इतर ठिकाणी अटक झालेल्या गुन्हेगारांची माहीती एकत्रीत करुन त्यांचेवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले.
What's Your Reaction?






