रचना बजार व्यापारी संकुला समोरील अनाधिकृत फ्लेक्स हटवण्याची मागणी, इंदापूर पोलिसांसह नगरपरिषद आणि इंदापूर आगाराला निवेदन
आय मिरर
इंदापूर शहरातील रचना बजार व्यापारी संकुला समोर सातत्त्याने फ्लेक्स लावले जाताहेत. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने याठिकाणी लावलेले फ्लेक्स हटवून यापुढे या ठिकाणी फ्लेक्स लावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी मागणी रचना बजार व्यापारी ट्रस्टने लेखी निवेदनाव्दारे इंदापूर नगर परिषद, बस स्थानक आगार आणि इंदापूर पोलीसांकडे मंगळवारी दि.२७ फेब्रुवारी रोजी केली आहे.कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गाळधारकांच्या वतीने देण्यात आला आहे.
आमच्या व्यापारी संकुलासमोर अनाधिकृतपणे येण्या जाणाऱ्या रस्त्यावर फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत. या बोर्डमुळे संकुलनातील दुकानदारांना व ग्राहकांना येण्या-जाण्यासाठी त्रास होत आहे.तसेच फ्लेक्स बोर्ड मुळे संकुलनातील दुकाने झाकली गेली आहेत. तसेच रचना बजार व्यापारी संकुलासमोर बोर्ड लावण्यास परवानगी देवू नये व सध्या त्या लावलेल्या त्या फ्लेक्स बोर्डवर तात्काळ कारवाई करावी असं या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रचना बजार व्यापारी ट्रस्ट कडून यासंदर्भातील इंदापूर नगर परिषदेला निवेदन देण्यात आली आहेत. मात्र या गंभीर प्रश्नाकडे नगरपरिषद सातत्याने डोळेझाक करत आहे. त्यामुळे आता तरी नगरपरिषदेने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून तातडीने यावरती कारवाई करण्याची मागणी ट्रस्टचे अध्यक्ष अमर लेंडवे यांनी केली आहे.
इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हे सर्वात मोठे व्यापारी संकुल असून या ठिकाणी ८४ गाळे धारक आहेत.इंदापूर नगरपरिषदेला सर्वाधिक महसूल या संकुलातून मिळतो.मात्र कोणत्याही सुविधा आम्हाला मिळत नसल्याचा आरोप गाळे धारकांनी केला आहे. इंदापूर नगरपरिषद प्रश्न सोडवत नाही तर बस स्थानक प्रशासन ही आमच्या प्रश्नांकडे दूर्लक्ष करते.सातत्याने लावल्या जात असणाऱ्या अनाधिकृत फ्लेक्समुळे याचा त्रास आम्हा व्यापाऱ्यांना होतो.वारंवार अशा फ्लेक्स वरती नगर परिषदेने कारवाई करण्याची मागणी आमच्या सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली मात्र जाणीवपूर्वक नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ही लेंडवे यांनी केला.
What's Your Reaction?