पाटील है तो मुमकिन है ! 20 वर्षाचा वाद मिटवला अन् रस्त्याचं भूमिपूजन ही केलं 

Sep 16, 2024 - 20:05
Sep 16, 2024 - 20:08
 0  1205
पाटील है तो मुमकिन है ! 20 वर्षाचा वाद मिटवला अन् रस्त्याचं भूमिपूजन ही केलं 

आय मिरर                    

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गिरवी (ता. इंदापूर) येथील रस्त्याचा 20 वर्षाचा वाद सर्वांना विश्वासात घेऊन बावडा येथे आठवड्यापूर्वी सामोपचाराने मिटवला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गिरवी ते पाटीलवस्ती या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी दि.12 रोजी करण्यात आले.

गिरवी ते पाटीलवस्ती या सुमारे 3.5 कि.मी.लांबीच्या रस्त्याच्या काम मार्गी लागणार असल्यामुळे, क्षीरसागर वस्ती, शिंदे वस्ती, पाटील वस्ती, ठोकळे वस्ती, ननवरे वस्ती, गोखले वस्ती या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. या रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली.   

यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. या भूमिपूजन प्रसंगी निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मनोज पाटील, कमाल जमादार, संजय बोडके, प्रकाशराव मोहिते, विकास पाटील, विलासराव ताटे देशमुख, किरण पाटील, रणजीत वाघमोडे, रणजीत घोगरे, विठ्ठल घोगरे आदींसह गिरवी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow