शक्तीपीठ मार्गात एक दोन नाही तर 50 हजार कोटीचा घोटाळा होणार,राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप

आय मिरर
शक्तीपीठ महामार्ग हा भाविकांच्या साठी नाही हा विकासासाठी नाही तर राजकीय नेत्यांच्या विशेषता सरकारमध्ये असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे.या मार्गाच्या कामत 50 हजार कोटीचा घोटाळा होणार आहे. असा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते आणि माझे खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे ते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेट्टी म्हणाले की,देशभरामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत जे रस्ते बांधले जात आहेत. पण आता तिथेही फार पारदर्शक आणि स्वच्छ कारभार होतोय असा दावा मी करत नाही, पण तरीसुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जे सहा पदरी रस्ते बांधले आहेत. त्याचा एक किलोमीटरचा खर्च साधारणपणे 35 कोटी रुपये येतो. शक्तीपीठ महामार्गाचा विचार करायचा झाला तर 802 किलोमीटर लांबी आहे आणि खर्च आहे 86 हजार 300 कोटी. म्हणजे एका किलोमीटरचा खर्च आला 107 कोटी 60 लाख रुपये म्हणजे तिप्पट खर्च येतो.
जो रस्ता साधारणपणे तीस ते पस्तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे तो 86 हजार कोटी रुपयात होत आहे. त्या ठिकाणी 50,000 कोटीचा मोठा घोटाळा होणार आहे.एक समृद्धी महामार्ग झाला आणि आमदाराचा दर 50 कोटी निघाला आता किती निघणार आहे मला माहित नाही.एवढा मोठा भ्रष्टाचार धर्माच्या नावाने देवाच्या नावाने करायचा उद्योग ही मंडळी करत आहेत.
ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्याला मात्र जमिनीचा मोबदला कवडीमोल किमतीने दिला जात आहे. समृद्धी महामार्गाला किंवा अन्य राष्ट्रीय महामार्गाला ज्या शेतकऱ्यांचे रस्ते गेले त्यांना बाजार भावाच्या चौपट आणि पाचपट रक्कम दिली गेली.
2022 साली जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एक शासन निर्णय झाला समृद्धीला दिला जाणारा जो मोबदला आहे त्याच्या 60% कपात करून केवळ 40% मोबदला देण्याची नवी दुरुस्ती केली गेली त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल त्यांच्या जमिनीचे पैसे मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला राजकीय नेते मात्र मालामाल होणार आहेत.
शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली कोल्हापूर आणि सातारा विशेषता कराड परिसर या तीन जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे.कारण सांगली कोल्हापूर भागामधून जेव्हा हा शक्तिपीठ महामार्ग जातो तो सहा नद्यांवर मोठ्या पुलासाठी भराव भरावे लागणार आहेत आणि ते भराव महापुरास कारणीभूत ठरतील.
जागतिक बँकेने सुद्धा महापुराचा अभ्यास करण्यासाठी मंडळ पाठवले ते तेव्हा महापुराला कारणीभूत करण्यासाठी पुलाचे भराव आहेत असा अहवाल दिलेला असताना ही नवीन पूल होत आहेत.हे सर्व कशासाठी तर काही लोकांच्या फायद्यासाठी, सध्या रत्नागिरी ते नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो नुकताच बांधून पूर्ण झाला आहे. त्याच्यावर अतिशय तुरळक अशी रहदारी आहे. त्या महामार्गावरून एका टोल वरून दररोज किमान 40 लाख रुपये पोलची वसुली झाली पाहिजे तरच तो फायद्यात राहतो पण जेमतेम दहा ते अकरा लाख रुपये एवढीच पोल वसुली होत आहे. म्हणजे सध्याचा प्रचलित महामार्ग तोट्यात असताना राज्य सरकारने त्याला समांतर दुसरा महामार्ग काढायची गरजच काय ?
अशी कुठल्या भक्ताने मागणी केली होती का? पंढरपूरला जाताना ट्रॅफिक जाम झालं का? तुळजापुरला जाताना किंवा औंढा नागनाथ ला जाताना की परळी वैजनाथ ला जाताना की नरसोबाच्या वाडीला जाताना ट्रॅफिक जाम झाले ? कुठे ट्रॅफिक जाम झाले होते? कुठे भाविकांची गैरसोय झाली होती ? कुठे आठ आठ तास लोक चिष्टत होते ? मग हा रस्ता कशासाठी आणि हे भाविक नेमकं गोव्याला कशासाठी जातात हे मला न सुटणार कोड आहे.
What's Your Reaction?






