बिग ब्रेकिंग | इंदापूरात गणेश विसर्जनाला गाल बोट,विसर्जनाला गेल्यावर घाटात एक जण बुडाला

Sep 17, 2024 - 18:13
Sep 17, 2024 - 18:15
 0  1699
बिग ब्रेकिंग | इंदापूरात गणेश विसर्जनाला गाल बोट,विसर्जनाला गेल्यावर घाटात एक जण बुडाला

आय मिरर

पुण्याच्या इंदापूर मध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे.इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपुर गावी नीरा नदीमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेला 16 वर्षीय युवक बुडाल्याची माहिती मिळतेय.

अनिकेत कुलकर्णी असं या तरुण युवकाचं नाव असून प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी गावकरी आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन दाखल असून होडीच्या मदतीने त्याचा शोध घेतला जातोय.

दुपारी तीन वाजता निरा नरसिंहपुर येथील नीरा नदीच्या घाटावर तो गणेश विसर्जनासाठी गेला होता आणि त्याचवेळी ही घटना घडली तीन वाजल्यापासून त्याचा शोध घेतला जातोय.

अनिकेत हा मागील नऊ वर्षापासून इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नरसिंह वेदपाठ शाळेमध्ये शिकत होता.तो मुळचा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील हांडुग्री गावचा रहिवासी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow