इंदापूरच्या भिगवण मध्ये पावसाचा कहर ! बस स्थानकाच्या आवाराला आलं तळ्याच स्वरूप

आय मिरर (निलेश मोरे)
गेल्या चार-पाच दिवसापासून पुण्याच्या इंदापूर तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळतोय, इंदापुरातील महत्त्वाच असणाऱ्या भिगवण बस स्थानकाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं त्याला तळ्याच स्वरूप आल आहे.
भिगवन बस स्थानकातून बारामती अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत कडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, मात्र या ठिकाणचा परिसर पाण्याखाली गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
भिगवण शहरांमध्ये गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. आज सकाळी देखील जोरदार पावसाने भिगवण शहराला झोडपले. या पावसाचा सर्वाधिक फटका भिगवण बस स्थानकला परिसराला बसला आहे. येथे साचलेल्या पाण्यामुळे स्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पाण्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भिगवणकरांसाठी बस स्थानकातून प्रवास करणे आता आव्हानात्मक बनले आहे. तसेच पावसाचा जोराचा फटका बस स्थानकाच्या पाठीमागे थोरातनगर परिसराला बसला आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
What's Your Reaction?






