चार तास चालला थरार...आरोपीच्या सुटकेसाठी त्या महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याला मध्य प्रदेशात ओलिस ठेवलं होतं

आय मिरर
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याच्या पूर्वसंध्येलाच अवघ्या महाराष्ट्र पोलीस दलाला हादरून सोडणारी घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस विभाग अलर्ट मोडवर असून या कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी जळगाव तसेच मध्य प्रदेशातील पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आले होते. अखेर, 4 तासांच्या थरारानंतर पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यास पोलिसांना यश आलं आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे.अवैध शस्त्र निर्मिती तथा गावठी कट्टा विक्रीसाठी कुख्यात असलेले उमर्टी गावात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर चक्क अवैध शस्त्र माफियांनी हल्ला चढविला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सोडविण्यासाठी चक्क शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करत त्याला मध्य प्रदेश हद्दीतील उमर्टी गावात तब्बल चार तास ओलिस ठेवले होते.
जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून स्थानिक पोलिसांची मदत घेत तब्बल चार तासाच्या थरार नाट्यनंतर ओलिस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका झाली.अवैध शस्त्र माफियांच्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी तथा दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधत ओलिस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.
4 तासांच्या थरारानंतर पोलिसाची सुटका
चार तासांच्या थरारानंतर अपह्रत पोलिस कर्मचाऱ्याची सुटका करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. एका गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यास आरोपींच्या नातेवाईकांनी अपहरण करून नेल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मधप्रदेश सीमेवर असलेल्या उमर्टी गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटने नंतर जळगावसह मध्यप्रदेशातील पोलिसांनी या पोलिस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी पोलिसांची मोठी कुमक रवाना केली होती. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी अपह्रत पोलिस कर्मचाऱ्यास पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी दिली आहे
What's Your Reaction?






