महाविकास आघाडीचं सरकार आल तर CM कोण? वडेट्टीवार म्हणतात...
आय मिरर
भाजप विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीतिला तिन्हही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहेत. यामुळे माविआची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र जर माविआ पुन्हा सत्तेवर आली तर या आघाडीचे नेतृत्व कोण करणार ? अर्थात मुख्यमंत्री कोण असणार ? असा सवाल वडेट्टीवार यांना विचारला असता ते म्हणाले,”ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल” असं स्पाष्ट विधान त्यांनी यावेळी केलं.
वडेट्टीवार म्हणाले,”ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल.. सर्वाधिक जागा आम्ही जिंकू. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल अशी आशा आहे. हे केवळ स्वप्न नाही. तर जनतेचा आम्हाला प्रतिसाद आहे” असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
त्यानंतर महायुतीत खडाजंगी होईल
महायुतीत वाद होईल. हे मी अगोदरच बोललो आहे. असं म्हणत वडेट्टीवार यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर भाष्य केलं. ते म्हणाले,” महायुतीत तिन्ही पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यातील अनेकांना कमळावर लढावं लागेल ज्या पद्धतीने वातावरण सरकार विरोधात आहे. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठी आहे आणि ती पुढे वाढत जाईल. यामध्ये लोकसभेपर्यंत काहीच होणार नाही.मात्र त्यानंतर खडाजंगी सुरू होईल असं भाकीत वडेट्टीवारांनी यावेळी वर्तवलं.
What's Your Reaction?