50 खोकेच नाही तर,70 खोके वाटप झाले आणि 70 खोक्यांचा विजय झाला - कैलास गोरंट्याल
आय मिरर
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केलीय.त्यासाठी आपण न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
या विधानसभा निवडणुकीत जालन्यात पैशांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला असल्याचा आरोप देखील त्यांनी करत ज्या ठिकाणी मी काम केलं त्या त्या ठिकाणी पैशाचा पाऊस पडल्याचा दावा ही त्यांनी केलाय.
बटेंगे तो कटेंगेचाही फॅक्टर निवडणुकीत चालला असल्याचं म्हणत त्यांनी 50 खोकेच नव्हेतर 70 खोके वाटप झाल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.जनतेच्या मनात माझा पराजय नाही तर विजय असल्याचं म्हणत त्यांनी खोतकर यांचं नाव न घेता हा विजय त्यांचा नसून 70 खोक्यांचा विजय असल्याची टीका देखील त्यांनी केलीय.
निवडणुकीत हरलो असलो तरी खचून न जाता गाठी भेटी सुरु केल्यायत.आता महानगरपालिका आमचं लक्ष असल्याचं गोरंटयाल यांनी म्हंटल आहे.
What's Your Reaction?