Indapur | इंस्टाग्राम वरती केलेल्या मॅसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

May 4, 2025 - 17:11
May 4, 2025 - 17:24
 0  1707
Indapur | इंस्टाग्राम वरती केलेल्या मॅसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

आय मिरर 

इंस्टाग्राम वरती केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून करण्यात आलाय.इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात शनिवारी तीन एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर वालचंदनगर पोलिसांनी पाच तासाच्या आत मध्ये या घटनेतील आरोपीला गजाआड केलंय.आकाश मुशा चौगुले असं 22 वर्षीय खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर याप्रकरणी राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.खून झालेला व्यक्ती आणि आरोपी हे दोन्ही एकाच गावातील आहेत.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार याने त्याच गावातील आपला नातलग असलेल्या आकाश मुशा चौगुले यांच्या इंस्टाग्राम वरती आकाश चौगुले यांच्या बहिणीचा फोटो मेसेज करून पाठवला होता. यावरून आकाश चौगुले आणि आकाशची आई शांतबाई चौगुले हे राजेश पवार याच्याकडे त्याच्या मौजे अंथुर्णे येथील घरी जाब विचारण्यासाठी गेले होते.

आकाश चौगुले याने राजेश ऊर्फ तात्या पवार याला "तु माझ्या बहिणीचा फोटो इन्सटाग्राम वरती मॅसेज व्दारे मला का पाठविला" याबाबत विचारणा केली. त्याचा राग मनता धरुन राजेश ऊर्फ तात्या पवार याने आकाश चौगुले याचा जोरात गळा पकडुन व दाबुन त्याला उचलुन त्याच्या घरासमोर असलेल्या मोकळया जागेमध्ये पडलेल्या दगडावर जोरात आपटले. त्यावेळी आकाश चौगुले हा निचपीत पडल्याचे पाहुन त्याचा धरलेला गळा सोडुन राजेश ऊर्फ तात्या पवार हा तिथुन काही समजायच्या आतमध्ये पळुन गेला.

त्यानंतर आकाश चौगुले याला उपचारकामी त्याच्या घरातील नातेवाईकांनी लासुर्णे येथील देसाई हॉस्पीटल मध्ये ऍडमिट केले मात्र उपचारापुर्वी आकाशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी घोषित केले. या घटनेची वालचंदनगर पोलिसांना माहिती मिळताच प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे घटनास्थळी भेट देवुन घडलेल्या घटनेची संपुर्ण माहिती घेतली.

त्यानंतर सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे मारहाण करणारा राजेश ऊर्फ तात्या पवार याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली.

यावेळी तो कडबनवाडी गावचे हद्दीमधील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये लपुन बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी सदर आरोपीचा मोठ्या शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. 

सदर घटनेच्या अनुषंगाने घटनेमधील प्रत्यक्षदर्शी व मयत आकाश चौगुले याची आई शांताबाई मुशा चौगुले यांच्या फिर्यादीवरून वालचंद नगर पोलिसांनी गुन्हा रजि. नंबर १४५/२०२५ बी.एन.एस १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर हे करत आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्र्य चांदणे, जगदीश चौधर, विकास निर्मळ, पोलीस अंमलदार अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी पार पाडली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow