इंदापुरात बनावट नोटा चलनात आणण्याच्या होता प्रयत्न,इंदापूर पोलिसांकडून एकाला अटक

आय मिरर
इंदापूर बसस्थानकावर बनावट नोटांचा व्यवहार करताना दोघांना इंदापूर पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. मात्र यापैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी आसिफ सिराजुल शेख याला ताब्यात घेतल असून त्याच्याकडून तब्बल पाचशे रुपयांच्या 26 बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्यात शिवाय त्याचा मोबाईल देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
तर त्याचा अन्य एक साथीदार हलीम जब्बार सय्यद हा मात्र पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरलाय.हे दोघेही झारखंड राज्यातील रहिवासी आहेत.
रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे पोलिसांना ही माहिती मिळाली, माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा संशयीतांना ताब्यात घेतलं. मात्र यापैकी एक जण फरार झाला.पोलिस चौकशीत आसिफ सिराजुल शेख याच्याकडून 500 रुपयांच्या एकाच सिरीयल क्रमांकाच्या एकूण 26 नोटा पोलिसांना मिळाल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून त्याचा मोबाईल देखील हस्तगत केलाय.जप्त करण्यात आलेल्या नोटा स्थानिक बँकेच्या मशीनने तपासल्यानंतर त्या बनावट असल्याचं स्पष्ट झालंय.ह्या सर्व नोटा झारखंडमधील अमरूद्दीन शेख या ओळखीच्या इसमाने दिल्याचं आसिफ सिराजुल शेख याने पोलिसांना सांगितले आहे.
What's Your Reaction?






