अजित पवारांच्या आवाहनाला महायुतीमधील स्थानिक नेत्यांनीच दिलं आव्हान..! इंदापूरचा श्री छत्रपती कारखाना बिनविरोध नाहीच

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिनविरोध करण्याचे आवाहन केलं होतं मात्र अजित पवार यांच्या आव्हानाला महायुतीमधील स्थानिक नेत्यांनीच आव्हान दिलेय.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.तरीदेखील संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी आता 45 उमेदवार मैदानात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे. त्यामुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना अपयश आलंय.
अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली लढणाऱ्या पॅनेल ला शरद पवारांच्या पक्षाने पाठिंबा दर्शवलेला होता.पक्षाच्या काही उमेदवारांना पॅनल मध्ये संधी द्यावी अशी मागणी देखील केली होती.परंतु अजित पवारांनी आणि पृथ्वीराज जाचक यांनी पॅनल ची उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यात सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या शरद पवार गटातील एकाही उमेदवाराचे नाव यादीत नसल्याने शरद पवार गटातील सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेत खंत व्यक्त केली आहे. शिवाय या निवडणुकीत आपण सहभाग घेणार नसल्याचेही तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी घोषित केलंय.
संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 18 मे रोजी मतदान पार पडणार असून 19 मे रोजी कारखान्याचे नवे कारभारी ठरणार आहेत. यामध्ये अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली श्री जय भवानी माता विकास पॅनल कडून 21 उमेदवार मैदानात आहेत तर त्यांना शह देण्यासाठी छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून उमेदवार देण्यात आलेत. याशिवाय इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : गट क्र. १ लासुर्णे : पृथ्वीराज साहेबराव जाचक, जामदार शरद शिवाजी, गट क्र. २ सणसर : निंबाळकर रामचंद्र विनायक, निंबाळकर शिवाजी रामराव, गट क्र. ३ उद्धट : घोलप पृथ्वीराज श्रीनिवास, कदम गणपत सोपान, गट क्र. ४ अंथुर्णे : शिंगाडे विठ्ठल पांडुरंग, दराडे प्रशांत दासा, नरुटे अजित हरीश्चंद्र, गट क्र. ५ सोनगाव : अनिल सीताराम काटे, बाळासाहेब बापूराव कोळेकर, संतोष शिवाजी मासाळ, गट क्र. ६ गुणवडी : कैलास रामचंद्र गावडे, सतीश बापूराव देवकाते, निलेश दत्तात्रय टिळेकर, ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन : पाटील अशोक संभाजीराव,अनुसूचित जाती /जमाती : मंथन बबनराव कांबळे, महिला राखीव प्रतिनिधी : सौ.राजपूरे माधुरी सागर, सौ. सपकळ सुचिता सचिन,इतर मागास प्रवर्ग : शिंदे तानाजी ज्ञानदेव,भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास : डॉ. श्री पाटील योगेश बाबासाहेब
श्री छत्रपती बचाव पॅनेल पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : गट क्र. १ लासुर्णे : श्री. संजय सोमनाथ निंबाळकर,श्री. प्रताप मोहन पवार,गट क्र. २ सणसर : श्री. संग्राम दत्तात्रय निंबाळकर ,श्री. अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर,गट क्र. ३ उद्धट : श्री. करणसिंह अविनाश घोलप,श्री. तानाजी साहेबराव थोरात,गट क्र. ४ अंथुर्णे : श्री. राजेंद्रकुमार बलभिम पाटील,श्री. बाबासो भगवान झगडे,गट क्र. ५ सोनगाव : श्री. रविंद्र भिमराव टकले,गट क्र. ६ गुणवडी : श्री. नितीन अशोक काटे,ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन : श्री.सत्यजीत भाऊसाहेब सपकळ, अनुसूचित जाती /जमाती : श्री. बाळासो उर्फ भाऊसो गुलाब कांबळे,महिला राखीव प्रतिनिधी : सौ. सिता रामचंद्र जामदार,सौ. पद्मजा विराज भोसले,इतर मागास प्रवर्ग : श्री. संदिप वसंतराव बनकर,भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास : श्री. तुकाराम गणपत काळे
What's Your Reaction?






