इंदापुरातील व्याहळीच्या माळावर आज जिल्हाध्यक्ष केसरीचा थरार..

Apr 1, 2025 - 08:41
 0  492
इंदापुरातील व्याहळीच्या माळावर आज जिल्हाध्यक्ष केसरीचा थरार..

आय मिरर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने आज मंगळवारी 1 एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यातील व्याहळी येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडणार आहे.यामध्ये प्रथम क्रमांकास जिल्हाध्यक्ष केसरी किताबासह रोख रक्कम एक लाख 11 हजार 111 रुपयाचे पारितोषक दिले जाणार असल्याची माहिती आयोजक अतुल शेटे पाटील महेश जठार यांनी दिली.

आज सकाळी 9 वाजल्या पासून या बैलगाडा शर्यतीला सुरुवात होणार असून अंतिम स्पर्धा दुपारी 4 च्या सुमारास पार पडणार आहे. या स्पर्धेत जवळपास 400 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माऊली कटके,भोर मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह प्रसिद्ध असलेला छोटा पुढारी धनश्याम दराडे उपस्थित राहणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow