लग्न जमलं पण होणारा नवरा पसंत नव्हता, मग काय दिली दीड लाखाची सुपारी...काढा काटा !

Mar 31, 2025 - 18:41
Mar 31, 2025 - 18:45
 0  3364
लग्न जमलं पण होणारा नवरा पसंत नव्हता, मग काय दिली दीड लाखाची सुपारी...काढा काटा !

आय मिरर 

होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्याने सागर कदम याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आलाय. 

याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे.आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे,शिवाजी रामदास जरे,सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सागर जयसिंग कदम याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे रा. गुघलवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याला ताब्यात घेत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केलेची कबुली दिली आहे.याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतल असून आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेतली आहे.

मयुरी दांगडे हिला सागर कदम सोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने 1 लाख 50 हजार रुपयांची सुपारी देऊन ही मारहाण घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे,पोसई सलीम शेख, पोसई किशोर वागज, पोसई मारुती मेतलवाड, पो.हवा. कर्चे, पो.हवा. गायकवाड, पो. हवा. देवकर, पो. हवा. काळे, पो. हवा. चांदणे, पो.हवा. यादव, पो. हवा. कापरे, पो. कॉ. बाराते, पो. कॉ. गरूड, पो.कॉ. भानवसे यांच्या पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow