9 एप्रिल पासून पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वेक्षण प्रक्रिया होणार सुरू

Apr 1, 2025 - 09:19
 0  125
9 एप्रिल पासून पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्वेक्षण प्रक्रिया होणार सुरू

आय मिरर 

पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेच्या भूसंपादन करण्यासाठी मोजणी करावी लागणार असून, त्यासाठी आवश्यक 4 कोटी 80 कोटी रुपयांचे शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 9 एप्रिल पासून पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.एक तारखेपासून ड्रोन द्वारे भूसंपादनाच्या सर्वेक्षणाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. विमानतळाच्या प्रस्तावित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन विमानतळाचे काम सुरु करावे, अशा सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी केल्या आहेत.विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पुरंदर विमानतळाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत या सूचना केल्या आहेत.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 2832 हे.आर. क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार शासनाने मान्यता दिली आहे. मोजणीसाठी लागणारे 4 कोटी 80 लक्ष रुपये शुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 9 एप्रिल पासून ड्रोन सर्व्हेक्षणाला सुरुवात करावी, मोजणीपूर्वी गावकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी, अशा सूचनाही पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या आहेत. 

भूसंपादन प्रक्रियेचे तात्काळ नियोजन करुन अचूक व पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण करावी, नियोजित क्षेत्रासाठी प्रस्तावित केलेल्या गावांतील ७/१२ अद्ययावत असल्याची तसेच मोजणीमध्ये असलेल्या वस्तुस्थितीनुसार ७/१२ असल्याची, त्या गावांतील पीक पाहणी झाली असल्याची खात्री करा, ड्रोन सर्व्हेक्षण करा, जिल्हाधिकारी यांच्या नियोजित गावांमध्ये बैठका झाल्यानंतर नोटीस पाठवून मोजणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

पार पडलेल्या बैठकीत अधिसूचना प्रसिद्धी, ड्रोन सर्वेक्षण, मोजणी शुल्क, शासकीय जमीन वर्ग करणे, चर्चेने दर ठरविणे व निवाडा, चर्चा फिस्कटल्यास सक्तीचे भूसंपादन व निवाडा करणे, सरकारी क्षेत्र व वनक्षेत्र महामंडळास हस्तांतरीत करणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, भूमी अभिलेख व पोलीस विभाग यांनी मौजे वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या ७ गावांतील संयुक्त मोजणी पूर्ण करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow