इंदापूर बस स्थानकातून महिलेच्या पर्समधून 8 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने पळवला
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर बस स्थानकावरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या अलका वसंत बनकर यांच्या पर्समधील दागिने व रोख रक्कमेची चोरी झाल्याची घटना 2 मार्च रोजी घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, मिनी गंठण, बांगड्या, नेकलेस, अंगठ्या, जुबे व कानातील सोन्याचे टॉप्स ज्याची एकूण किंमत 7 लाख 80 हजार रुपये व रोख रक्कम 24 हजार असा एकूण 8 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
याबाबत अधिक माहिती अशी की अलका वसंत बनकर (वय 59 वर्ष व्यावसाय गृहिणी रा.अकलूज ता.माळशिरस) या 2 मार्च रोजी आपले पती वसंतराव बनकर यांच्यासह अकलूज वरून इंदापूर येथे आल्या. इंदापूर येथून बस बदलून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, मिनी गंठण, बांगड्या, नेकलेस, अंगठ्या, जुबे व कानातील सोन्याचे टॉप्स ज्याची एकूण किंमत 7 लाख 80 हजार रुपये व रोख रक्कम 24 हजार असा एकूण 8 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. यावरून इंदापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What's Your Reaction?