तुमच्या बाजूने निकालाची कागदपत्र तयार करते मला 25 हजार द्या ! शेतकऱ्याने थेट कार्यक्रमच केला

Mar 1, 2025 - 08:09
Mar 1, 2025 - 08:31
 0  1325
तुमच्या बाजूने निकालाची कागदपत्र तयार करते मला 25 हजार द्या ! शेतकऱ्याने थेट कार्यक्रमच केला

आय मिरर

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता त्याबाबत सन 2020 पासून तहसीलदार यांच्याकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देणे बाबतची प्रक्रिया बाकी होती.

सदर निकालाची कागदपत्रे तक्रारदाराच्या बाजूने तयार करून द्यावे म्हणून कावेरी विजय खाडे (वय 48 वर्षे, महसूल सहाय्यक वर्ग 3 तहसील कार्यालय इंदापूर, रा.संघवीनगर भिगवन रोड बारामती) यांनी 30 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले.

त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. सापळा रचून संबंधित महसूल सहाय्यक कावेरी खाडे यांना 25 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow