Pune Crime | इंदापुरात माजी मंत्र्याच्या भावाची मुजोरी, वर्गणीच्या कारणातून डॉक्टरला रुग्णालयात मारलं

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बावडा गावात यात्रेच्या वर्गणीवरून डॉक्टरला मारहाण झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू उदयसिंह पाटील हे मारहाण करताना या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत.मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
गावातील भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीतील काही लोक वर्गणी मागण्या करता बावडा गावातील डॉक्टर भागवत जाधव यांचे खासगी रुग्णालयात गेले होते. याच ठिकाणी त्यांच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली. या दरम्यान उदयसिंह उर्फ भैय्यासाहेब पाटील यांनी डॉक्टरला लागोपाठ तब्बल तीन कानशिलात लगावल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
मंगळवारी 29 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. नेमकी ही मारहाण का झाली ? डॉक्टर आणि यात्रा कमिटी यांच्यात वाद का झाले ? याचं ठोस कारण पुढे आलेले नाही. शिवाय या संदर्भात इंदापूर पोलिसात अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
What's Your Reaction?






