वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट,उत्तम जाधव खून प्रकरणातील पाच जणांना 24 तासाच्या आत अटक

Mar 1, 2025 - 07:30
 0  2115
वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट,उत्तम जाधव खून प्रकरणातील पाच जणांना 24 तासाच्या आत अटक

आय मिरर

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात श्रेय वादाच्या लढाईतून खोरोची येथील उत्तम जालिंदर जाधव या 34 वर्षे युवकावर आमच्या दुश्मनांना आमच्या खबरी देतो असं म्हणत धारदार शस्त्राने सपासप वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान जाधव यांचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी 24 तासाच्या आत पाच आरोपींना जेरबंद केल आहे. राजु भाळे, नाना भाळे, रामदास भाळे, शुभम आटोळे, बालाजी वाघमोडे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे सातारा सोलापूर नगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उत्तम जाधव यांच्या वरती 27 फेब्रुवारी रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर परिसरात जीवघेणा हल्ला झाल. यात ते गंभीरित्या जखमी झाले होते.यानंतर त्यांना उपचार कामी अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राजु भाळे, नाना भाले, तुकाराम खरात, निरंजन पवार, रामा भाळे, दादा आटोळे, शुभम आटोळे, स्वप्नील वाघमोडे व त्यांच्या सोबत असलेल्या इतर इसम यांनी चार चाकी व दोन चाकी गाडीमधुन येत उत्तम जाधव दोन चाकी गाडीला आडवी मारुन तुला लय मस्ती आलीय का, तु आमच्या दुश्मन असलेल्या लोकांना मदत करतो, आमच्या टिपा देतो, आमच्या भांडणात मध्यस्थी करतो असे म्हणत राजु भाळे व त्याच्या सोबत असलेल्या साथिदार यांनी उत्तम जाधव यास लोखंडी कोयते, लोखंडी तलवारीने डोक्यावर, पाठीवर तसेच पायावर वार केले तसेच जवळ पडलेले दगड उचलुन अंगावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर त्यांना उपचारकामी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारकामी अकलुज येथे दाखल केले मात्र उपचारात झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

वालचंदनगर पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या घटनेतील आरोपींचा शोध घेत होते. तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी राजु भाळे व त्याच्या सोबतचे इतर ०३ आरोपी हे भिगवन राशीन रोडवर असुन ते हैद्राबाद याठिकाणी पळुन जाण्याची तयारी करत असलेबाबतची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ पावली उचलत राजेंद्र ऊर्फ राजु भाळे, नाना भाळे, रामा ऊर्फ रामदास भाळे, शुभम ऊर्फ दादा आटोळे, स्वप्नील ऊर्फ बालाजी वाघमोडे यांना ताब्यात घेतले.

सदर गुन्ह्याचा तपास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डोनगे करीत आहेत.

वर्चस्वाच्या लढाईचा रक्तरंजित शेवट....

उत्तम जाधव व जाधव यांची इतर सहकारी आणि गुन्ह्यातील आरोपी हे इंदापूर तालुक्यातील खोरोची या एकाच गावातील रहिवासी असून त्यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. यातून त्यांच्यात विविध कारणांमुळे वेळोवेळी वाद होवु गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

25 फेब्रुवारी रोजी रोजी पप्पु हेगड़कर हा बाळु मामाची मेंढरे चारणेसाठी गेलेला असताना अंकित कांबळे याने त्यास दमदाटी केली होती. त्या कारणांवरुन दिनांक 27 फेब्रुवारी रोजी या गुन्ह्यातील आरोपी व संकेत हेगडकर यांच्यामध्ये खोरोची येथे झालेल्या वादातुन आरोपी राजु भाळे व त्याचे इतर साथिदार यांनी मिळून संकेत हेगडकर यांच्यावर गोळीबार केला होता.त्याअनुषंगाने इंदापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी राजेंद्र ऊर्फ राजु भाळे तसेच त्याचे इतर साथिदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर पुणे, सातारा, सोलापुर, अहिल्यानगर या जिल्हांमधील पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या पथकाने केली कारवाई....

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सो, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेची पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे,स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदिप संकपाळ तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक मिलिंद मिठापल्ली, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पोहवा गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, जगदीश चौधर, गणेश काटकर, दादासाहेब डोईफोडे, दत्तात्रय चांदणे, महेश पवार, विकास निर्मळ, अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.फौ.बाळासाहेब कारंडे, पो.हवा.अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अतुल ढेरे यांनी पार पाडली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow