बारामतीत प्रा.शेख सुभान अलीच्या फोटोला फासलं काळ,शारदा व्याख्यानमालेत व्याख्यानास हिंदू समाजाचा विरोध

आय मिरर
बारामती मध्ये प्राध्यापक शेख सुभान अली यांच्या फोटोला काळ फासण्यात आलेला आहे.बारामती शहरामध्ये शारदा व्याख्यानमाला आयोजित केली आहे. १ मे ते ५ मे रोजी ही व्याख्यानमाला आहे. यामध्ये प्राध्यापक शेख सुभान अली यांचे व्याख्यान अयोजित करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालीत शेख सुभान अली यांचं व्याख्यान वगळण्यात यावं अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेली होती. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा त्यांच्या फोटोवर हे काळ फासण्यात आल आहे.
शेख सुभान अली हे खोटा इतिहास लोकांसमोर मांडतात.नागपूर मधे अश्याच पद्धतीने या सुभान अली याने वक्तव्य करून वादग्रस्त विधान करून धार्मिक तेढ निर्माण करता असा आरोप हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला होता.
त्यामुळे अशा वादग्रस्त वक्त्याच्या भाषणामुळे बारामती सारख्या शांत शहरात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते म्हणून पोलीस प्रशासनास सकल हिंदू समाजाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की या व्यक्तीचे व्याख्यानमालेतील भाषण रद्द करण्यात यावे अन्यथा काही सामाजिक तेढ निर्माण होईल अशा घटना घडल्या तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असे पत्र सकल हिंदू समाजाने दिले होते.
त्या अनुषंगाने भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर, शहर अध्यक्ष विवेक साळुंके, ऋषी शेलार यांनी रात्री शेख सुभान यांच्या फोटोला काळ फासले.
What's Your Reaction?






