पहलगाम हल्ल्याचा निषेध ! इंदापूरच्या भिगवण मध्ये पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवला

May 1, 2025 - 09:28
May 1, 2025 - 09:33
 0  107
पहलगाम हल्ल्याचा निषेध !  इंदापूरच्या भिगवण मध्ये पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवला

आय मिरर 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत आणि या झेंड्यावरून दुचाकी फिरवत जाहीर निषेध करण्यात आला आहे.मातंग समाजाच्या वतीने हा निषेध नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

24 एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या घटनेच्या निषेधार्थ भिगवण मध्ये तीव्र असा निषेध नोंदवत समाज बांधवांच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडविण्यात आला आहे. यासोबतच या झेंड्यावरून दुचाकी फिरवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेचे देशभर पडसाद उमटत असताना ग्रामीण भागात देखील तीव्र अशा शब्दात निषेध नोंदवला जातोय तर आता समाज बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे देखील पायाखाली तुडवण्यात येत आहेत.

इंदापूरच्या भिगवण मध्ये देखील बुधवारी रात्री अशा पद्धतीने निषेध करण्यात आला.यावेळी भारत माता की जय...निम का पत्ता कडवा हे पाकिस्तान भडवा है...अशा घोषणा देखील देण्यात आल्या यावेळी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow