गुजरात दाखवतो म्हणून इंदापुरात जेष्ठ नागरिकांना दहा लाखाला गंडवलं

आय मिरर
इंदापूर शहर व तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या जेष्ठ नागरिकांकडून सहलीसाठी विमान प्रवास,निवास,नाष्टा व भोजन खर्च म्हणून नितीन ट्रॅव्हल कं.चालक मालक नितीन भारत पांडगळे रा.टेभुर्णी ता.माढा जि.सोलापूर याने फसवणूक केल्याबद्दल अखेर इंदापूर न्यायालयात दि.२१ मार्च रोजी केस दाखल करण्यात आली आहे.अशी माहिती सहल प्रमुख बाबासाहेब निवृत्ती घाडगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, नितिन टुर्स & ट्रॅव्हल कं.चालक मालक नितीन भारत पांडगळे याने इंदापूर शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिकांचे गुजरात दर्शन सहलीचे नियोजन करून,जेष्ठ नागरिक संघाकडून सहलीतील सहभागी सदस्याकडून प्रत्येकी २३००० रू प्रमाणे ४४ सदस्यांचेकडून ९,७४,०००० इतकी रोख रक्कम व काहींचे ऑनलाईन घेऊन सहलीचे वेळापत्रक तयार करून,पुणे ते अलाहाबाद या टाटा इंडिगो विमानाची बोगस तिकीटे बुक करुन,जेष्ठ नागरिक संघास पाठविली.
त्यानुसार जेष्ठ नागरिकांनी सहलीसाठी नियोजन केले.त्यानुसार २५ नोव्हेबर रोजी सर्व सहल सभासद सकाळी ८:३० वाजता ठरल्याप्रमाणे,इंदापूर काॅलेज समोर जमा झाले.बराच वेळ ट्रॅव्हल बसची वाट पाहत राहिले पण बस किंवा नितीन भारत पांडागळे हे आलेच नाहीत.
त्यानंतर गुजरात दर्शन व्हाट्सअप ग्रुपवर नितीन पांडगळे याने स्वत:चा भाऊ सचिन पांडगळे अपघातात मरण पावला आहे.(RIP)असा मेसेज रात्री १० वाजता टाकल्याचे निदर्शनास आल्याने जेष्ठ नागरिक महासंघाचे निवडक सभासद,टेभुर्णी येथे पांडगळे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यास गेले असता, समक्ष चौकशीनंतर असे समजले की,कोणताही अपघात झाला नसून, नितीन पांडगळे याने सहलीचे घेतलेले सर्व पैसे इतरत्र खर्च झाल्याने सहल घेऊन जाणे शक्य नाही,म्हणून तो फरार झाला होता.
त्यानुसार जेष्ठ नागरिक संघाकडून इंदापूर पोलीस स्टेशनला दि.२८ नोव्हेबर २०२४ रोजी तक्रार अर्ज दिल्याने नितिन पांडगळे पोलीस स्टेशनला हजर होऊन,झालेल्या चुकीबद्दल माफी मागून जेष्ठ नागरिक संघाकडून 'सहलीसाठी घेतलेले पैसे माझ्याकडून इतरत्र खर्च झाले असून,ती सर्व रक्कम ही तीन हप्त्यात देण्यासाठी तीन चेक देऊन,नोटरी करून दिले.परंतु दिलेले तीनही चेक बँकेतून पास न झाल्याने खोटे चेक देऊन पुन्हा जेष्ठ नागरिक संघाची फसवणूक केल्याबद्दल,नितीन भारत पांडगळे याच्यावर ज्येष्ठांची फसवणूक केल्याबद्दल इंदापूर न्यायालयात भा.का.क. १३८ अन्वये चा गुन्हा दाखल केला अशी माहीती सहल प्रमुख घाडगे सर तत्कालीन संघ अध्यक्ष चित्तरंजन पाटील सहल उपप्रमुख भानुदास पवार व संघ सचिव हनुमंत शिंदे यांनी सर्व सभासदांना दिली आहे.
What's Your Reaction?






