Dound leopard दौंडच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्यांची टोळी, दिवसा ढवळ्या मुक्त संचार स्थानिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात केला कैद

May 8, 2025 - 10:57
 0  1751
Dound leopard दौंडच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्यांची टोळी, दिवसा ढवळ्या मुक्त संचार स्थानिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात केला कैद

आय मिरर 

दौंड तालुक्यातील दहिटणे गावातील बापूजी बुवा वस्तीवरील एका 11 महिन्याच्या मुलाला भल्या पहाटे उचलून नेत ठार केल्याची घटना मागील आठवडाभरापूर्वीच घडली होती. यानंतर याच परिसरात दिवसाढवळ्या मुक्तपणे संचार करणाऱ्या एक नवे दोन नव्हे तब्बल तीन बिबट्यांचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरा मध्ये काहीच झालाय. 

वेळ सकाळी आठची,एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल तीन बिबटे एका मागोमाग शेताच्या बांधावरून अगदी मजेत फिरताना दिसून येत आहेत.जणू काही त्यांची शिवारफेरीच सुरू आहे की काय असा प्रश्न यामुळे सर्वांना पडलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये या बिबट्यांचा मुक्त संचार कैद केलाय.

यामुळे दहिटणे आणि मिरवडी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.सध्या या परिसरात वन विभागाने सात पिंजरे लावले आहेत, पण अजूनही एकाही बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं नाही. अगदी आयटीत दिवसाढवळ्या हे बिबटे शिवार फेरी करताना सर्वसामान्यांना आढळून येत असल्याने वन खात्यासमोर त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान आहे.

मिरवडी, दहिटणे आणि खामगाव ही गावं मुळा-मुठा नदीच्या काठावर वसलेली असून, आजूबाजूला घनदाट जंगल आणि उसाच्या शेतांनी वेढलेली आहेत. बिबट्यांना लपायला इथं पुरेसा वाव आहे. त्यामुळेच या परिसरात सातत्याने बिबट्याचा संचार असतो. हे बिबटे मानवी लोक वस्तीवर आता हल्ले देखील करताहेत.भरदिवसा बिबटे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी आणि शेतमजूर आता शेतात जाणं टाळत आहेत, त्यामुळे शेतीची कामं ठप्प झालीत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow