मालुंजकर फार्मवर श्री.दत्त जन्मोत्सव साजरा ; सोहळ्यास हजारोंची उपस्थिती

Dec 26, 2023 - 21:58
Dec 27, 2023 - 07:17
 0  247
मालुंजकर फार्मवर श्री.दत्त जन्मोत्सव साजरा ; सोहळ्यास हजारोंची उपस्थिती

आय मिरर (देवा राखुंडे)

इंदापूर मधील गोखळी येथील मालुंजकर फार्म वरती वज्रेश्वरी दत्त मंदीरात मंगळवारी दि.२६ डिसेंबर रोजी सायंकाळी श्री.दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. इंदापूर मधील प्रसिध्द व्यवसायिक वसंतराव मालुंजकर परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा साजरा केला जातो. यावर्षी देखील हा सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

श्री.दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प.अँड.शेषांगर महाराज बोबडे यांचे सुश्राव्य असे हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हरिकिर्तन पार पडल्यानंतर हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत पुष्पवर्षाव करुन श्री.दत्त महाराजांच्या जन्माचा पाळणा गावून श्री.दत्त महाराजांच्या जन्माचे स्वागत करण्यात आले.महाआरती करुन हा सोहळा साजरा करण्यात आला.

मालुंजकर परिवाराकडून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. इंदापूर शहरासह पंचक्रोशितील हजारो भक्तांची या सोहळ्याला उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow