शहा महादेवनगर येथील मच्छीमारांची दिवाळी गोड,जाधव कुटुंबाने 19 वर्षाची परंपरा जपली 

Nov 8, 2023 - 09:08
Nov 8, 2023 - 09:08
 0  591
शहा महादेवनगर येथील मच्छीमारांची दिवाळी गोड,जाधव कुटुंबाने 19 वर्षाची परंपरा जपली 

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील शहा महादेवनगर येथील जाधव बंधूंकडून मच्छीमारांची दीवाळी गोड करण्यात आलीय.मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून जाधव कुटुंबाकडून मच्छीमारी करुन उदर निर्वाह करणाऱ्या 132 कुटुंबांना दीवाळी शिधाचं वाटप करण्यात आलेय या मध्ये गरा,साखर,डाळ,मैदा,तेल,साबण या वस्तूंचा यात समावेश असून या उपक्रमाला गेल्या १९ वर्षाची परंपरा आहे.प्रतिवर्षी जाधव कुटुंब यासाठी लाखो रुपये खर्च करते यावर्षी देखील ही परंपरा अखंडपणे जपली आहे.

इंदापूर तालुक्यातील शहा महादेवनगर येथील तात्यासाहेब जाधव, रमेश जाधव, सुभाष जाधव, हर्षवर्धन जाधव, डॉ राहुल जाधव कुटुंबीयांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

यावेळी बोलताना रमेश जाधव म्हणाले आमचे बंधू तात्यासाहेब जाधव यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येतो, आपण गरीब परिस्थितीतून हालाखीतून घर प्रपंच उभा केला आहे, आपली दिवाळी गोड होत असताना आपल्या सोबत इतरही सहकाऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली 19 वर्षे अखंड हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी बोलताना इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे यांनी जाधव कुटुंबियांचे कौतुक केले गाव व परिसरातील गावांमध्ये सामाजिक भान जपत जाधव कुटुंबीय नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असतात अशी भावना यावेळी पांढरे यांनी व्यक्त केली.यावेळी बलभीम गंगावणे, अनिल सूर्यवंशी व मच्छीमार बांधव उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow