जगताप कुटुंबाच्या मदतीला धावले योग साधक, कवितके आणि पतंजली योग परिवाराकडून 1 लाखाची मदत

May 12, 2024 - 12:37
 0  1634
जगताप कुटुंबाच्या मदतीला धावले योग साधक, कवितके आणि पतंजली योग परिवाराकडून 1 लाखाची मदत

आय मिरर

पतंजली योग परिवारातील महिला साधक सौ.सुनिता जगताप यांचा मुलगा मारुती (पिनू) जगताप हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरुन जात असताना त्यांचा पुणे सोलापूर महामार्गावर हिंगणगांव परिसरात अपघात झाला होता. यात उपचारा दरम्यान मारुती(पिनू) जगताप यांचे दि.26 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या परिवाराला यातून सावरण्यासाठी योग शिक्षिका निर्मला गंगाधर कवितके यांनी वैयक्तीक 51 हजार तर पतंजली योग परिवाराकडून रुपये 51 हजार रुपये अशी एकूण 1 लाख 2 हजार दोन रुपये ची मदत पोहोच करण्यात आली.

अपघातात जखमी झालेल्या जगताप यांच्या सुनबाई मनीषा जगताप या गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.यात पतंजली योग परिवाराच्या आर्थिक मदतीने जगताप कुटुंबाला आधार मिळाला आहे.

जगताप कुटुंब हे गरीब असून कष्ट करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहे.त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.मनीषा जगताप यांच्यावर उपचार करण्यासाठी पैशाची गरज आहे असे आवाहन पतंजली योग परिवाराचे दत्तात्रय अनपट यांनी वर्गामध्ये केले होते या आव्हानास सर्वांनी भरभरून प्रतिसाद देत मतद केली.सामाजिक भान लक्षात ठेवून व दुष्काळी परिस्थिती असून सुद्धा पतंजली परिवारातील पुरुष व महिला साधकांनी स्वखुशीने रुपये 51 हजाराचे दान संकलन केले. शिवाय योग शिक्षिका निर्मला गंगाधर कवितके यांनी वैयक्तीक 51 हजार रुपये मतद केली. ही सर्व रक्कम जगताप कुटुंबास दवाखाना खर्चासाठी सुपूर्द केली.

या आर्थिक मदतीनुसार एवढेच दिसून आले की पतंजली योग परिवारातील सर्वसाधारकांचे नातं कौटुंबिक व जिव्हाळ्याचे झाले असून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे अडचणीत असणाऱ्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहने आत्ताच्या कलियुगामध्ये आदर्श घेण्याजोगा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow