"राज्यात जीव की प्राण" इंदापूर मात्र भाजपा राष्ट्रवादीत धगधगती आग

Sep 12, 2023 - 19:42
Sep 14, 2023 - 11:33
 0  1541
"राज्यात जीव की प्राण" इंदापूर मात्र भाजपा राष्ट्रवादीत धगधगती आग

आय मिरर

राज्यात अजित पवारांचा गट भाजप सोबत गेला आणि सत्तेत सहभागी झाला.राष्ट्रवादीत फुट पडली अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा ट्रिपल इंजीनच सरकार बनल. आता हे तिघेही राज्यात एकमेकांचे जीव की प्राण बनलेत.मात्र स्थानिक पातळीवर सध्या तरी विसंगती पहायला मिळत असून स्थानिक नेत्यांच मात्र जुळता जुळत नसल्याचं चित्र आहे.

इंदापुरातील हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचा राजकिय वाद सर्वश्रुत आहे.सध्या मात्र अजित पवार गट महायुतीत आहे.तरीही भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकमेकाविरोधात वक्तव्य करताना पहायला मिळातायेत.

बुधवारी दि.१३ सप्टेंबर रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना देखील टोले लगावलाय. बाहेर कुठे गेलो तर इंदापूर तालुक्याचं नाव सांगायचं म्हटलं तर दबक्या आवाजात बोलावं लागतं कारण तालुक्याचं कर्तुत्वच तेवढं मोठं आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना टोला लगावलाय शिवाय परवा माझा पाय फ्रॅक्चर झाला तर काही लोक त्यावर देखील बोलतात मात्र वरातीत नाचण्यापेक्षा व्हॉलीबॉल खेळताना पडलेलं कधीही चांगलं असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी भरणे यांना खडे बोल सुनावलेत.

त्यामुळे आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या टीकेला आमदार दत्तात्रय भरणे काय प्रत्युत्तर देतात हे पहावं लागणार आहे.मात्र दुसरीकडे राज्यात अजित पवार गट आणि भाजपसोबत असला तरी स्थानिक पातळीवरचे मतभेद अजूनही दूर झालेले दिसत नाहीत. राष्ट्रवादीत फुट पडून अजित पवारांचा गट सत्तेत सामील झालाय. अजित पवारांचा गट वरिष्ठ पातळीवर जरी महायुतीत सामील झाले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र आता कार्यकर्त्यांमध्ये काहीप्रमाणात मतभेद आहेत.

राज्यात अजित पवार महायुतीत सहभागी झाले असले तरी पुण्याच्या इंदापुरात मात्र तीनही पक्षाची तोंड तीन दिशेला दिसतायेत.यात भाजप आणि राष्ट्रवादीचं पटतं नसल्याचं दिसतंय.मागील चार दिवसापूर्वी व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करतेवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला हाच धागा पकडत वरकुटे बुद्रुक येथील जाहिर सभेत आमदार भरणेंच्या समोर अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरती सडकून टीका केली होती.

तर अपघाताने तालुकाध्यक्ष झालेल्या हनुमंत कोकाटे यांनी आपल्या पात्रतेप्रमाणे बोलावं,कमीशन घेऊन निवडणूका जिंकता येत नाहीत अशी टीकाही भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांनी केली होती.त्यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी ही हनुमंत कोकाटे यांच्या या टीकेचा निषेध नोंदवला आहे.आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समोरच अशा पद्धतीने कोकाटे यांनी बोलणं राजकारणात अपेक्षित नाही तर सुखदुःखामध्ये सामील होण हे अपेक्षित आहे.जाणीवपूर्वक हर्षवर्धन पाटील यांना त्रास दिला जातो नक्कल करण्याची हर्षवर्धन पाटील यांना गरज नाही त्यांची उंची किती आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. सिंह जखमी झाला म्हणून कोल्हा राजा होत नाही सिंह सिंहच असतो,मात्र कोकाटे यांचं विधान ऐकल्यानंतर यांचे संस्कार दिसतात त्यांची वैचारिक पातळी दिसून येते. त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो असं जामदार यांनी म्हटलं आहे.यावरून राज्यात जीव की प्राण असताना इंदापूरात मात्र धगधगती आग पाहायला मिळत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow