नीती आयोगाला लगाम घाला - खा.सुप्रिया सुळे
आय मिरर
दिल्ली पाठोपाठ मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील इंदापूर मध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी नीती आयोगाचे लोक मुंबईला आले होते, त्यांनी अनेक प्रस्ताव दिले आहेत. नीती आयोगाने जरूर प्रस्थाव द्यावेत परंतु काही उपक्रम केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित करू शकतात. नीती आयोगाकडून जो प्रस्ताव आलाय त्यात देशातील पाच गावांचा समावेश आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. तिथले लोकप्रतिनिधी आहेत सरकार आहे त्यामुळे नीती आयोगाने कन्सल्टंट म्हणून लिमिटेड रोल करावा त्याच्यापुढे नीती आयोगाला अधिकार नाही.नीती आयोग आणि केंद्र सरकारच जर मुंबई चालवणार असतील तर मुंबईचे आमदार खासदार नगरसेवकांनी काय करायचं असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पार पडलेय आणि या नंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
What's Your Reaction?