शरद पवार यांचा 'प्लॅन बी' रेडी ! पवारांची पुढची पावलं काय असू शकतात.
आय मिरर
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहील असा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार व त्यांचे समर्थक चांगलेच बॅकफूटला आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता शरद पवार यांना नव्या पक्षाचे नाव, चिन्ह यांबाबत निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार उद्यापर्यंत पर्याय देण्याचा अवधी शरद पवार यांच्याकडे असेल.
शरद पवार गटाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांचा ‘प्लॅन बी’ तयार असल्याची माहिती दिली आहे. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह यांबाबत विचार करून ठेवाल असल्याचेही या नेत्यांनी सांगितले आहे
सर्वोच्च न्यायालयात जाणार
निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या समर्थक नेत्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, या निर्णयामागे अदृश्य महाशक्तीचा हात असल्याचे सांगत भाजपकडे बोट दाखवले.जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना, आपण शरद पवार यांच्यासोबत उभे राहण्याचे ठरवले असून पक्ष असो किंवा नसो आपण पवार यांच्यासोबत कायम उभे राहणार असल्याचे सांगितले.
शरद पवारांचे नवे चिन्ह कोणते?
राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्याने शरद पवार यांच्या नव्या पक्षाचे नाव काय असणार याबाबत चर्चा रंगली आहे. शरद पवार उगवत्या सूर्याचे चिन्ह निवडणार असल्याचे देखील समजते.
What's Your Reaction?