नागनाथ पाटलांचा सुप्यातही दरारा कायम ! अवैद्य धंदे मोडीत काढण्यासाठी कसली कंबर
आय मिरर
इंदापूर पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असणारे सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांची नुकतीच बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना नागनाथ पाटील यांनी पार पाडलेल्या कर्तव्याची पोचपावती म्हणून पाटलांना थेट सुपा पोलीस ठाण्याचा चार्ज मिळाला अन् पाटलांनी सुप्यातही आपला दरारा कायम ठेवला. पाटील यांनी पंधरवाड्यापूर्वीच सुपा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून बेकायदेशीय चालाणारे उद्योगधंदे मोडीत काढण्यासाठी पाटलांनी कंबर कसलीय.नुकतीच रात्रगस्त करीत असताना त्यांनी बेकायदेशी दारु विक्रीवर कारवाई केली असून चौघांवर गुन्हे दाखल करीत 3 लाख 07 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11 सप्टेंबर रोजी पहाटे 04 वाजताच्या सुमारास रात्रगस्त करीत असताना ओमनी गाडी नंबर MH 11 CG 1848 यामधून अवैद्य गावठी हातभट्टी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय बातमीदारा कडून खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, चालक पोलीस हवालदार शितोळे यांना मिळाली होती.
सुपा पोलिसांनी सुपा ते लोणी पाटी या रोडवरती सापळा रचून शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपा येथे सदर गाडी पकडून गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये 35 लिटर क्षमतेचे 10 ड्रम अवैद्य गावठी हातभट्टी दारू ने भरलेले मिळून आली. सदरची अवैध्य हातभट्टी दारू व गाडी असे मिळून एकूण 3 लाख 07 हजार 500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गाडी चालक प्रतीक बाळासो रणदिवे, राहणार सांगवी तालुका फलटण जिल्हा सातारा, त्याचा साथीदार सुमित विठ्ठल बनसोडे, राहणार सांगवी तालुका फलटण जिल्हा सातारा, दारू तयार करणारा राहुल राठोड, राहणार दाते वस्ती उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे, हातभट्टी दारू विकत घेणारा सुनील सचिन खुडे राहणार सांगवी तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्यावरती सुपा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328, 34 व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65,83,98 आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार जाधव, वाघोले, पोलीस हवालदार शितोळे, साळुंखे, पोलीस शिपाई जावीर, ताडगे,दरेकर, साळुंखे यांनी मिळून केली.
What's Your Reaction?