इंदापूर पोलिसांकडून मॉक ड्रिल ! अश्रुधूरांच्या नळकांड्या ही फोडल्या

आय मिरर
सध्या देशामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातोय पुढील काही दिवसातच लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. तर ईद-ए-मिलाद सह आगामी विधानसभा निवडणुकांचा माहोल असणार आहे. अशात कायदा सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणारी स्थिती निर्माण झाली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी इंदापूर पोलिसांकडून इंदापूर शहरात आज दि.13 सप्टेंबर रोजी मॉक ड्रिल करण्यात आले. यात इंदापूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी,पोलीस अंमलदार यासोबत पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंदापूर पोलिसांनी हे दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिक केल.यात लाठी चार्ज,अग्निशामकव्दारे आग नियंत्रण, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यासह वेळप्रसंगी गोळीबार कसा करावा हे प्रत्यक्षिव्दारे इंदापूर पोलिसांनी दाखवून दिल्याचं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी म्हटल आहे.
आगामी काळात गणेश विसर्जन असून ईद ए मिलाद ही आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचा आवाहन पोलिसांनी केला आहे.राज्यात आगामी दोन महिन्याच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत आणि या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात शिवाय प्रत्येकाला आपले सण आनंदाने साजरे करता यावेत त्यासाठी आजच्या या मॉक ड्रिल मधून आम्ही कायदा सुव्यवस्था राखत पोलिसांना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना करतो असंही पोलीस निरीक्षक कोकणे यांनी म्हटलं आहे.
What's Your Reaction?






