अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर ! पुण्याच्या इंदापुरात लाडू वाटप

Sep 13, 2024 - 17:45
Sep 13, 2024 - 17:46
 0  528
अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर ! पुण्याच्या इंदापुरात लाडू वाटप

आय मिरर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. यानंतर पुण्याच्या इंदापुरात आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करत आनंद साजरा करण्यात आला.

अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जवळपास 177 दिवसापासून दिल्लीत तुरुंगात होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करत दिलासा मिळाल्याने इंदापुरात एकमेकांना लाडू भरवून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय.

आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते,तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पाटील,युवाध्यक्ष निलेश ढुके,आप्पासाहेब पाटील व इतर कार्यकर्त्यांनी इंदापूरात लाडूचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. आज (१३ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज संध्याकाळपर्यंत तिहार जेलमधून त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीसाठी सूचिबद्ध केली होती. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्यावर मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपवरून सीबीआयने त्यांना अटक केली होती. यानंतर केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मिळण्यासंदर्भातील अशा दोन स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow