ठोस पुरावा नव्हता,हाती होतं ते फक्त चितेजवळ जळणाऱ्या लाकडावरील रक्ताचे डाग ! पण पोलिस लय हुशार…वाचा इंदापूरात काय घडलं होतं

Nov 26, 2024 - 15:02
Nov 26, 2024 - 17:37
 0  920
ठोस पुरावा नव्हता,हाती होतं ते फक्त चितेजवळ जळणाऱ्या लाकडावरील रक्ताचे डाग ! पण पोलिस लय हुशार…वाचा इंदापूरात काय घडलं होतं

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील तावशी येथील घडलेल्या एका खुनाचा छडा पोलिसांनी अगदी शिताफिनं लावला आहे. खुनाचा गुन्हा घडला, पण त्यासंदर्भात पोलिसांच्या हाती कोणताच महत्त्वाचा पुरावा लागला नव्हता. पण कोणताही सक्षम पुरावा नसताना पोलिसांनी या खुनाचा गुन्ह्याचं कोडं उलघडवलं आहे.चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास ग्रामीण पोलिसांना यश आलं पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तावशी गावात ही घटना घडली होती. 

परभणी जिल्ह्यातील  गंगाखेडमध्ये राहणाऱ्या हरिभाऊ धुराजी जगताप (वय 74) या आजोबांचा खून झाल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण इथे हरिभाऊ जगताप राहत होते. या प्रकरणी पोलिसांनी दादासाहेब मारुती हरिहर (वय 30) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय 23) यांना अटक केली आहे. 

काय घडलं होतं ? 

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसरातील तावशी गावातील स्मशानभूमीत एक मृतदेह जळत आहे. चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडले आहेत, अशी माहिती गावच्या पोलीस पाटलांनी 16 नोव्हेंबरला वालचंदनगर पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी आले.त्यांनी पंचनामा केला. तिथे स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेली हाडं, तसेच काही अंतरावर रक्त पडलं हे पोलिसांच्या निदर्शनास आले. रक्ताचे डाग ताजे असल्यानं हा खूनाचा प्रकार असू शकतो, असा अंदाज पोलिसांनी लावत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

जळणाऱ्या चितेजवळ सापडलेली लाकडं एका वखारीमधील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांचं पथक पोहोचलं.संबंधीत आरोपींनी अंत्यविधीसाठी लाकडे घेऊन गेल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात पोलिसी खाक्या दाखवताचं संबंधीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. 

जगताप हे नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय आरोपी दादासाहेब हरिहर याला होता.त्यामुळे त्याने मित्र विशाल याच्याशी संगनमत करून जगताप यांचा खून करण्याचा कट रचला. जगताप यांना 15 नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सतोबाची यात्रा इथे जाऊ, असं त्यांनी सांगितलं. याच वेळी आरोपींनी प्रवासादरम्यान इंदापूर तालुक्यातील तावशी गावातील स्मशानभूमीजवळ वाहन थांबवलं. अन् तिथेचं जगताप यांच्या डोक्यात दांडके मारुन त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यांनी जगताप यांचा मृतदेह त्याच ठिकाणच्या स्मशानभूमीत जाळून टाकला.

चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याने वालचंदनगर पोलिसांसह पुणे ग्रामीण पोलिसांचं कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow