त्याला बुलेट वरून मिरवायचं होतं पण सासऱ्याच्या जीवावर ! बायकोचा छळ केला नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला

May 30, 2025 - 14:34
May 30, 2025 - 14:36
 0  429
त्याला बुलेट वरून मिरवायचं होतं पण सासऱ्याच्या जीवावर ! बायकोचा छळ केला नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला

आय मिरर 

माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये म्हणत एका 25 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून उपाशी ठेवल्याचा प्रकार दौंड परिसरात उघडकीस आला आहे.

वैष्णवी किरण मोरे अस या पिडीत महिलेचे नाव असून तिच्या तक्रारीवरून आता दौंड पोलिसात तिचा पती सासू सासरे आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09 एप्रिल 2020 रोजी ते 22 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान दौंड गावचे हद्दीत SRPF गृप नं 7 येथे हा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार पीडित महिने आपल्या वडिलांना सांगितला आणि त्यानंतर या पीडित माहितीने थेट दौंड पोलीस ठाणे गाठले.

सासू सुमन सुरेश मोरे, सासरे सुरेश नागनाथ मोरे, पती किरण सुरेश मोरे, दिर नितीन सुरेश मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे असून हे सर्वजण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळी मिया गावचे रहिवासी आहेत.

नेमकं काय घडलं ?

किरण मोरे आणि त्यांची पत्नी वैष्णवी हे दौंड तालुक्यातील एस आर पी एफ आत मध्ये राहत होते. वैष्णवीचे पती किरण मोरे हे बुलेट दुचाकी घेण्याकरिता वैष्णवीला माहेरहून 1 लाख रूपये घेऊन ये असा तगादा लावत होते. यावरून ते शिवीगाळ करीत असत. काही दिवसातच तिथे वैष्णवीची सासू-सासरे आणि दीर राहण्यासाठी आले.यावेळी वैष्णवी ने ही बाब सासू सासरे यासह दिर नितीन मोरे यांना सांगितली. मात्र या तिघांनीही किरण मोरे याचीच बाजू घेतली. 

आता हे सरपंच वैष्णवीला वाद घालून शिवीगाळ करीत होते.तु एकलुती एक मुलगी असून देखील तुझे वडील 1 लाख रूपये का देवू शकत नाही असे म्हणून मानसिक व शाररीक छळ करून उपाशी पोटी ठेवून जाचहट करू लागले. अखेर वैष्णवी ने या सर्व त्रासाला कंटाळून ही बाब आपले वडील बाळासाहेब अर्जुन चव्हाण याच्या कानावर घातली. त्यानंतर वैष्णवीने वडिलांसोबत थेट दौंड पोलीस स्टेशन गाठले आणि पती सासू-सासरे आणि दिर या सर्वांविरोधात थेट गुन्हा दाखल केला.पोलीस हवालदार गायकवाड याचा अधिक तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow