सामसूम रात्र काळाकुट्ट अंधार तिघे घरात घुसले बेदम मारलं,एकाचा मृत्यू ! प्रकरण चोरीच की जुन्या वादाचं...? यवत मध्ये काय घडलं?

आय मिरर
कोयता गॅंग नंतर आता पुण्याच्या ग्रामीण भागात चड्डी बनेल गॅंग ने डोकं वर काढल्याच पाहायला मिळतंय. मागील आठवडाभरापूर्वी इंदापूरच्या बेलवाडीत या चड्डी बनेल गॅंग ने चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता बुधवारी 5 मार्चच्या रात्री साडेदहाच्या सुमारास दौंड तालुक्यातील यवत हद्दीतील निलकंठेश्वर मंदिराजवळ एका शेतात राहणाऱ्या कुटुंबावर या चड्डी बनेल गॅंग ने जीवघेणा हल्ला केलाय. यात तिघेजण गंभीर जखमी झाले तर अविनाश शशिकांत चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार याच बरोबर यवत पोलिस यांसह पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि श्वान पथकाने घटनास्थळाची भेट देत पाहणी केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, जुन्या वादातून हा प्रकार घडला की चोरीचा प्रकार होता याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात यवत पोलिसांनी दोन संशयित नातेवाईकांनाही ताब्यात घेतले आहे. त्यामुळे हा प्रकार चोरीचा की जुन्या वादाचा याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नेमकं काय घडलं ?
दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन जवळील एका घरात रात्रीच्या साडेदहा अकराच्या दरम्यान चड्डी व बनियान घातलेले तिघेजण घुसले...! त्यांनी घरातील पाच व्यक्तींना दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली..यात एकाचा मृत्यू झाला एक अति गंभीर झाला तर तीनजण जखमी झाले.
रेल्वे स्टेशन येथील निलकंठेश्वर मंदीरा जवळ शेतात शशिकांत चव्हाण यांचे घर आहे. बुधवारी ( दि ५) रात्री पावणे अकराच्या आसपास तीन अज्ञात चड्डी- बनियन घातलेल्या व्यक्ती घुसले आणि त्यांनी थेट दगड, काठ्यांनी घरात असलेल्या व्यक्तींना बेदम मारले. ही मारहाण एवढी क्रूर आणि बेदम होती की, अविनाश शशिकांत चव्हाण या 34 वर्षीय व्यक्तीचा यात मृत्यू झाला. घरात पाच लोक होते. त्यापैकी चार जण गंभीर जखमी झाले. यातीलही एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित तीन जणांना रुग्णालयात दाखल केले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हा नेमका जुना वाद आहे की, चोरीचा उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. याचा तपास पोलीस करत असून चव्हाण कुटुंबाचा त्यांच्याशी वाद होता, त्या दोन संशयित नातेवाईकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पुणे येथील ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक घटना स्थळी दाखल झाले होते. त्यांनीही पाहणी केली.
What's Your Reaction?






