पुणे जिल्हा हादरला ! दौंड मध्ये किरकोळ वादातून जन्मदात्या आईनेच केली दोन चिमुकल्यांची हत्या, पतीवर ही कोयत्याने वार

Feb 8, 2025 - 11:27
Feb 8, 2025 - 12:10
 0  8518
पुणे जिल्हा हादरला ! दौंड मध्ये किरकोळ वादातून जन्मदात्या आईनेच केली दोन चिमुकल्यांची हत्या, पतीवर ही कोयत्याने वार

आय मिरर

पुण्याच्या दौंड मधून अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येतेय. एका महिलेने चक्क आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केलीये.यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कोमल दुर्योधन मिंढे या 30 वर्षीय महिलेला ताब्यात घेतल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.

शंभू दुर्योधन मिढे वय ०१ वर्ष आणि पियू दुर्योधन मिढे वय ०३ वर्ष अशी मयत मुलांची नावे असून या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे.पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे.

आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow