गोळीबार झाल्यानंतर प्राध्यापकांची पोलीस ठाण्यात धाव ; वाचा सविस्तर

Oct 2, 2024 - 07:21
 0  783
गोळीबार झाल्यानंतर प्राध्यापकांची पोलीस ठाण्यात धाव ; वाचा सविस्तर

आय काॅलेज

इंदापूर शहरातील गजबजलेलं ठिकाण असलेल्या इंदापूर कॉलेज महाविद्यालयासमोर गोळीबार झाल्यानंतर कॉलेजमधील प्राचार्यांसह प्राध्यापकांनी इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.शाळा व महाविद्यालय परिसरात शिस्त,कायदा व सुव्यवस्थेचे पालन होण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.

सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी आय काॅलेजच्या समोरचं एकाने गोळीबार केल्याने शैक्षणिक परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने माजी मंत्री 

हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळातील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, श्री. नारायणदास रामदास हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, श्री. नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर व इंग्लिश मिडिअम स्कुल, येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना शिस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवेदन दिले आहे. 

झालेली दुर्घटना अतिशय गंभीर आहे. अशा घटनेने संपुर्ण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा घटना कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात. यामुळे शाळा महाविद्यालय परिसरात भितीचे वातावरण निर्माण होते. एस.टी.स्टँड परिसर ते महाविद्यालयाच्या गेटपर्यंत पार्किंग व्यवस्था अत्यंत अस्थाव्यस्त असते. काही मोकाट गैरवर्तन करणा-या युवकांचा या परिसरात मोठा वावर असतो. ज्यामध्ये विविध प्रकारच्या मोटारसायकल व इतर वाहनांचा वापर करुन गोंगाट तयार केला जातो. त्यामुळे मुलांना शिक्षण देण्यास व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा सतत प्रश्न निर्माण होतो. त्या कामी आपण योग्य ती कार्यवाही करुन महाविद्यालय व शाळा प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे, इंदापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका फौजीया शेख, मराठी माध्यम विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड , डाॅ शिवाजी वीर, डाॅ.भिमाजी भोर,डाॅ.सदाशिव उंबरदंड डाॅ.भरत भुजबळ व इतर दिडशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow