२३ डिसेंबरला भिगवणमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना केलं जाणार कायदे विषयक मार्गदर्शन

Dec 22, 2023 - 07:46
Dec 22, 2023 - 08:12
 0  108
२३ डिसेंबरला भिगवणमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना केलं जाणार कायदे विषयक मार्गदर्शन

आय मिरर

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये इंदापूर तालुका विधी सेवा समिती इंदापूर व तालुका वकील संघ इंदापूर आणि भिगवन पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमन मिनिमम कार्यक्रम अंतर्गत दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता, इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील श्याम गार्डन ,एसटी स्टँड समोर कायदेविषयक मार्गदर्शनपर जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती इंदापूर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी एल पाटील व इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड माधव शितोळे यांनी दिली.

सदर कार्यक्रमांमध्ये ॲड.शरद जामदार हे पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. ॲड .ए.टी. भोसले सायबर क्राईम, इंदापूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस एस साळुंखे वाहतुकीचे नियम, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

इंदापूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश.श्रीमती एस डी वडगावकर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहुन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणार आहेत तसेच सदर कार्यक्रमाला इंदापूर न्यायालयातील सह. दिवाणी न्यायाधीश के सी कलाल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे , सहा पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. 

सदर कायदेविषयक शिबिरामध्ये भिगवन परिसरातील विविध शाळातील आठवीच्या पुढील वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी हजर राहणार आहेत. त्यासाठी भिगवन पोलीस स्टेशन यांच्या वतीने आवश्यक त्या सूचना परिसरातील शाळांना देण्यात आली आहे अशी माहिती भिगवन पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow