भरतशेठ शहा मित्र परिवार आयोजित दहीहंडी तिरंगा संघाने फोडली ! सिनेअभिनेत्री मानसी नाईक व रशियन कलाकार ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू
आय मिरर
इंदापूर शहरात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या, दहीहंडी उत्सवात तीन तीन वेळा दहीहंडी संघाना मनोरे करावे लागले. दहीहंडी ची उंची अधिक असल्याने, अडीच तास प्रयत्न करून देखील कोणत्याही संघाला दहीहंडी पर्यंत पोहचता आले नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात शहरातील तिरंगा दहीहंडी संघाने सात थर करून, शिताफिने दहीहंडी फोडली व जमलेल्या गोपाल भक्तांनी एकच जल्लोष केला. यावेळी हजारोंच्या संख्येने गोपाळ भक्त उपस्थित होते.
इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या प्रांगणात गुरूवार ( दि. 29 ऑगस्ट ) रोजी भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेअभिनेत्री मानसी नाईक व रशियन कलाकार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
यावेळी दहीहंडी उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, अकलूजचे सरपंच शिवबाबा मोहिते पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विधीज्ञ राहुल मखरे, राष्ट्रवादीचे अमोल भिसे, तालुकाध्यक्ष विधीज्ञ तेजसिंह पाटील, आरपीआयचे शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा, शहा ग्लोबल स्कुलचे व्यवस्थापक अंगद शहा, रुचिरा शहा व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, शिवशंभो दहीहंडी संघ, नेताजी दहीहंडी संघ, छत्रपती शिवाजी दहीहंडी, स्वराज्य दहीहंडी संघ यांनी सहभाग घेतला होता. त्या सर्व संघाना सलामीला भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी नंदकुमार गुजर, डॉ. संजय शहा, डॉ. श्रेणिक शहा, संजय दोशी, गणेश महाजन, विधीज्ञ राकेश शुक्ल, विलास माने, रामकृष्ण मोरे, रवी सरडे, विधीज्ञ आशुतोष भोसले, आनंद केकाण, पोपट पवार, अंकुश माने, विनायक बाब्रस, गजानन गवळी, संदीप पाटील, शकील सय्यद, फिरोज पठाण, बिल्डर मोहसीन शेख, प्रशांत उंबरे, निखिल महाजन, श्रीकांत माने, रश्मी शेख, उमेश ढावरे व भरत शेठ शहा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी शुभेच्छा देताना राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत अमित शहा यांना घाबरून भाजपामध्ये जात होते. त्यावेळेला इंदापूरचे भरत शहा मात्र पवार साहेब यांना साथ देण्यासाठी आले. त्यामुळे भरत शहा यांचा मला अभिमान आहे. असे गौरवउदगार मेहबूब शेख यांनी काढले.
पुढे बोलताना शेख म्हणाले की, भगवान श्री कृष्णाच्या जन्माने सर्वत्र आनंद झाला आणि भगवान श्रीकृष्णाने कंस मामाची राजवट उलथवून टाकली. त्याच पद्धतीची भ्रष्ट राजवट, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर व राज्यातील उलथवून टाकायची आहे. असे आवाहन मेहबूब शेख यांनी उपस्थितीतांना केले.
यावेळी उपस्थित गोपाळ भक्तांना, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी शुभेच्छा दिल्या तर इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा व शहा परिवाराचे सर्वेसर्वा मुकुंदशेठ शहा यांनी गोपाळ भक्तांचे स्वागत केले.
What's Your Reaction?