तब्बल ४७७ युवकांनी केले रक्तदान, माजी सैनिकाच्या आव्हानाला दिला प्रतिसाद
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली या गावातील सेवानिवृत्त माजी सैनिक ज्ञानदेव गलांडे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत परिसरातील तब्बल ४७७ युवकांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले.
पुण्याच्या रेड प्लस या ब्लड बँकेच्या सामाजिक संस्थेमार्फत रक्तदान शिबिराचे उद्घाटन मेजर ज्ञानदेव गलांडे यांचे वडील शहाजी गलांडे व आई सुशिला गंलाडे,यांच्या हस्ते करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली.
यावेळी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, गणेश चिवटे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे, कोंढार चिंचोली चे सरपंच शरद भोसले, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र धांडे, अविनाश मोरे, नवनाथ कोकरे, शंकर कवडे, सुनील गोडसे, डॉ.गोरख गुळवे,लतेश पाटील, नितिन करचे, आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?