मालोजीराजे चौकातील बाह्यवळण मार्गावर दुचाकीला ट्रॅक्टरची पाठीमागून धडक, दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Jan 15, 2024 - 14:52
 0  955
मालोजीराजे चौकातील बाह्यवळण मार्गावर दुचाकीला ट्रॅक्टरची पाठीमागून धडक, दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

आय मिरर

इंदापूर येथील पुणे सोलापूर महामार्गावरील मालोजीराजे चौकातील बाह्यवळण मार्गावर दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीवरील श्राव्या लक्ष्मण देवकर या दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.तर तिचे आई वडील जखमी झाले आहेत.याबाबत ट्रॅक्टर चालक सोमनाथ अशोक ननवरे (वय 35 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर रा.घोटी ता.करमाळा जि.सोलापुर) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत राम माणिक आसबे (वय 38 वर्षे धंदा शेती रा हिंगणगाव ता इंदापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुरूप शनिवार (ता.13) रोजी सांयकाळी 6:30 चे सुमारास मौजे गलांडवाडी ता इंदापुर गावचे हदीत कदम गुरुकुल शाळेचे समोरील पुणे सोलापुर रोडवरील गतिरोधक जवळ फिर्यादीचा मामाचा मुलगा लक्ष्मण सुभाष देवकर त्यांची पत्नी स्वाती लक्ष्मण देवकर व मुलगी श्राव्या लक्ष्मण देवकर (वय 1.5 वर्ष) असे त्याचेकडील मोटारसायकल (क्र.एम एच -42- ए टी-6419) हिचे वरून पुणे सोलापुर हायवे रोडने पुणे बाजुकडून इंदापुर बाजुकडे जात असताना मोटारसायकलचे पाठीमागुन येणारे ट्रॅक्टर (क्र.एम एच 45 एफ 7412) यावरील चालक सोमनाथ अशोक ननवरे (रा.घोटी ता.करमाळा जि सोलापुर) याने त्याचे ताब्यातील टॅक्टर हा हयगय, अविचाराने भरधाव वेगात चालवुन मोटारसायकल धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले.तर श्राव्या लक्ष्मण देवकर हीस पाठीस, डोक्यास मार लागुन तिचा मृत्यु झाला.यावरून इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

दरम्यान सदर ट्रॅक्टर चालकाने मद्य प्राशन केले असल्याचे तसेच अजून एका दुचाकीही पाठीमागून धडक दिल्याचे बोलले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow