पळसदेव येथील एल.जी. बनसुडे स्कूलचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
आय मिरर
एल.जी.बनसुडे स्कूलचा १२ वा वर्धापन दिन दि. जून रोजी साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव पब्लिक स्कूलचे संस्थापक, अध्यक्ष प्रा- महादेव झोळ उपस्थित होते. शाळेतील विविध खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच १० वी व १२ वी तील उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे उदघाटन योद्धा स्पोर्ट अकॅडमीचे सेक्रेटरी साहेबराव ओहाळ यांनी केले. ओहोळ म्हणाले की विद्यार्थ्यांना व्यायाम व फिटनेसची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्या आरोग्याकडेही लक्ष केंद्रित करावे.संस्थेचे संस्थापक हनुमंत बनसुडे यांनीही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले व पुन्हा नव्या दमाने कष्ट करून शाळेचे, पालकांचे व आपल्या गावाचे नावलौकिक करा असे आवाहन केले.
प्राचार्या वंदना बनसुडे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या कार्याध्यक्षा नंदा बनसुडे व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्कॉलरशिप व मंथन पात्र विद्यार्थी यांचा सन्मान व इतर सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन पुस्तिका वाटप करण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सचिव नितीन बनसुडे ,सदस्य हनुमंत मोरे ,अर्चनाताई बनसुडे ,पालकवृंद,सर्व विभाग प्रमुख , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मदने यांनी केले आणि आभार तेजस्विनी तनपुरे यांनी मानले.
What's Your Reaction?