माथाडी कामगारांच्या न्यायासाठी भिगवणमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा रास्ता रोको
आय मिरर(देवा राखुंडे)
भिगवण जवळील बिल्ट कंपनीतील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या उपोषणाला 15 दिवस होऊनही निर्णय होत नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गुरुवारी दि.०८ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा च्या सुमारास भिगवण येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.मंडल अधिकारी लोणी देवकर यांना यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या रास्ता रोको मध्ये मराठा महासंघाचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते. एवढी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
या संदर्भात बोलताना जगताप म्हणाले की,बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी येथील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत दिनांक 24 जानेवारी 2024 रोजीपासून तहसील कार्यालयाबाहेर पाच कामगार आमरण उपोषणाला बसलेले असून पंधरा दिवस होऊनही कायमचा निर्णय होत नाही सध्या ही त्यांचे आमरण उपोषण चालू आहे .
सदर कालावधीमध्ये माथाडी बोर्डाने एक फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे सदर प्रश्ननाबाबत मीटिंग आयोजित केलेली होती. त्यामध्ये 30 दिवसाचा कालावधी मागितला आहे.सदर उपोषण कर्ते कामगार यांची प्रकृती खालावलेली आहे.असे असतानाही 15 दिवस होऊनही बिल्ट कंपनी, माथाडी बोर्ड यांनी म्हणावी तेवढी दखल घेतलेली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार यांचेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. शासनाने गोरगरीब कामगार यांना तात्काळ नियुक्ती पत्र द्यावे. या मागणीसाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केले आहे.
सदर कामगार गेली पंधरा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास संपूर्णतः बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी ,माथाडी बोर्ड पुणे ,कामगार आयुक्त कार्यालय पुणे व प्रशासन संपूर्णतः जबाबदार राहील असं जगताप यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?