सोमवारपासून निरा डाव्या कालव्याद्वारे शेटफळ तलावात सोडणार पाणी - आमदार दत्तात्रय भरणे

Sep 24, 2023 - 08:20
 0  503
सोमवारपासून निरा डाव्या कालव्याद्वारे शेटफळ तलावात सोडणार पाणी - आमदार दत्तात्रय भरणे

आय मिरर

निरा डावा कालव्याद्वारे शेटफळ तलावात येथे सोमवारपासून पाणी सोडले जाणार आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.सध्या पावसा अभावी इंदापूर तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेटफळ तलावातील पाण्याची पातळी खालावली होती. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना निरा डावा कालव्याद्वारे शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

श्री भरणे यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने येत्या सोमवारपासून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. यानुसार येत्या सोमवारपासून डाव्या कालव्याद्वारे शेटफळ तलावात पाणी सोडले जाणार आहे. याचा फायदा तलावाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.  

श्री भरणे यांनी शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे याचा सध्या दुष्काळाच्या स्थितीत आपली उभी पिके पावसाअभावी जगविण्यासाठी सध्या संघर्ष करीत असलेल्या व शेटफळ तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती सिंचित होण्यास श्री भरणे यांच्या तलावात पाणी सोडण्याच्या आदेशाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow