उजनीची पाणीपातळी कमालीची घटली,शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करावा लागु शकतो पाणीटंचाईचा सामना

आय मिरर
इंदापूरच्या उजनीची पाणीपातळी कमालीची घटल्याने शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करावा लागणार पाणीटंचाईचा सामना. डिसेंबरच्या मध्यावर उजनीत केवळ बारा टीएमसी जिवंत पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.
सोलापूर सोलापूर अहमदनगर सह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला जीवनदायी ठरलेलं उजनी धरण 123 टीएमसी क्षमतेचं आहे.मात्र शनिवार दि.16 डिसेंबर च्या प्राप्त माहितीनुसार सध्या उजनी धरणात केवळ 75.68 टीएमसी इतकाच एकूण पाणीसाठा आहे. या साठ्यापैकी 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो.डिसेंबरच्या मध्यावर्ती उजनी धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी केवळ 12.02 टीएमसी इतकाचं जिवंत पाणीसाठा असल्याने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच उन्हाळा सुरू होताच शेतकऱ्यांना पाण्याची झळ बसणार आहे.इतिहासात प्रथमच उजनी धरणाची अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे उन्हाळ्याचा हंगाम कसा घालवायचा यासह अनेक चिंता निर्माण झाल्या आहेत.
What's Your Reaction?






